Main Centers
International Centers
India
USA
Sadhguru Quotes
FILTERS:
SORT BY:
Clear All
सुख असो की दुःख, वेदना असो की आनंद, यातना असो की परमानंद, मुळात हे आतूनच घडतं.
भौतिक जगात जे काही घडतं, ती मुळात एक प्रकारची लाट आहे. तुम्ही जर चांगले नाविक असाल, तर प्रत्येक लाट ही एक संधी आहे.
तुमच्या भविष्याची काळजी करू नका. तुमचं वर्तमान चांगलं करा, आणि भविष्य फुलून येईल.
माझ्यासाठी, जीवन हे 'तुम्ही काय करता' याबद्दल नाही. तर 'तुम्ही कसं करता' याबद्दल आहे.
ताण हा काही एखाद्या विशिष्ट परिस्थितीचा परिणाम नाही - स्वतःच्या यंत्रणेचं योग्य व्यवस्थापन न करण्याचा तो परिणाम आहे.
मत्सर आणि हेवा यांचे मूलभूत स्वरूप म्हणजे अपुरेपणाची भावना. तुम्ही खरोखर आनंदी असाल, तर तुम्हाला कुणाचाही हेवा वाटणार नाही.
तुम्ही कोण आहात हे जर परिस्थिती ठरवत नसेल, पण परिस्थिती कशी असावी हे जर तुम्ही ठरवत असाल - तर तेच यश आहे.
जर तुम्ही निवडलंत, तर या क्षणी आनंदी असू शकता. तुम्हाला फक्त निवड करायची आहे.
आनंदात आणि आंतरिक कल्याणात जगण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे - जर आपण स्वतःच्या आत योग्य प्रकारचं वातावरण निर्माण केलं तर.
तुम्ही खरोखर जागरूक होऊन जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद फक्त तेव्हाच घेऊ शकता, जेव्हा तुम्हाला सतत ही जाणीव असेल की, तुम्ही नश्वर आहात.
या धरणी मातेच्या कुशीत आपलं पोषण होत आहे. स्वाभाविकपणे, आपण तिच्याबद्दल आदरभाव बाळगला पाहिजे.
तुमचं मन एका अग्नीच्या गोळ्यासारखं आहे. तुम्ही त्याला नियंत्रित केलं, तर ते सूर्यासारखं होऊ शकतं.