Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुम्ही तुमच्या मनाला खेळवलं पाहिजे - तुमच्या मनाने तुम्हाला खेळवू नये.
हा जीवनाचा विरोधाभास आहे: तुम्ही असंख्य खोट्या गोष्टी निर्माण करू शकता, पण इथं 'सत्य' हेच एकमेव आहे.
पुरेसं लक्ष दिल्यास, जवळजवळ कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवता येऊ शकतं.
जर तुम्हाला जीवनाबद्दल सखोल अंतर्दृष्टी हवी असेल, तर तुमच्याबद्दल असलेल्या इतरांच्या मताचा तुमच्यासाठी काहीच अर्थ असू नये.
आपल्याकडे जी काही कौशल्ये, क्षमता आणि प्रतिभा असतील - या सगळ्या तेव्हाच अर्थपूर्ण ठरतात, जेव्हा समतोल असतो.
ध्यानलिंग हे परिपूर्ण ऊर्जा शरीरासह असलेल्या एका परम अस्तित्वासारखं आहे. शिव स्वतः इथं बसलेले आहेत.
योग शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंवर चमत्कारिकपणे काम करतो. फक्त इतकंच की, तुम्हाला ते करावं लागेल.
या जीवनात तुम्ही पुढे जात आहात, की नाही हे जाणून घ्यायचं असेल, तर फक्त हे पहा, की तुम्ही काल होता त्यापेक्षा आज थोडं अधिक आनंदी आहात का.
तुम्हाला जेव्हा 'तुम्ही सध्या कुठे आहात' याबद्दल पूर्ण स्पष्टता असते, तेव्हा अनुभवाची पुढची पातळी स्वतःहूनच तुमच्यासाठी प्रकट होते.
लोक कठोर परिश्रम करतात म्हणूनच यशस्वी होतात असं नाही. तर ते फक्त अशा प्रकारे करतात की, त्यातून योग्य तो परिणाम साधला जाईल.
जर तुम्ही तुमच्या मनामध्ये, भावनांमध्ये आणि शरीरामध्ये हवे तसे वातावरण निर्माण करू शकलात, तर तुमचे आरोग्य, आनंद आणि कल्याण यांची काळजी आपोआप घेतली जाईल.
तुम्हाला आवडणाऱ्या सीमांमध्ये वावरण्यापेक्षा, त्या सीमांच्या पलीकडं जाणं जास्त महत्त्वाचं आहे.